Eknath Shinde: शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून 50 हजारांचे अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान (Grant) वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

यासह राज्यातील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार असाही शब्द एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी विधानसभेत दिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भातील मदतीची रक्कम देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अँपचा (mobile app) वापर देखील करण्यात येणार आहे.

हे पण वाचा 👉  Crop loan list कर्ज माफी योजनेची नवीन यादी जाहीर

लवकरच मोबाईल अँप्लीकेशन द्वारे इ-पंचनामा (e-panchnama), त्यासाठी आवश्यक निधीची मागणी व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे यासाठी प्रणाली नव्याने विकसित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (satellite image) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येईल अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हे पण वाचा 👉  Crop Loan List : कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर ,गावावर याद्या पहा

राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्ती प्रवण क्षेत्र (objection prone area) आहेत. तिथे नागरिकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.