Eknath Shinde: शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून 50 हजारांचे अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Crop Insurance : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेशेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन परअनुदान (Grant) वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाणार आहेअशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


यासह राज्यातील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार असाही शब्द एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनीविधानसभेत दिला आहेनैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भातील मदतीची रक्कम देण्यासाठी होणारा विलंबकमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अँपचा (mobile app) वापर देखील करण्यात येणार आहे.

लवकरच मोबाईल अँप्लीकेशन द्वारे पंचनामा (e-panchnama), त्यासाठी आवश्यक निधीची मागणी  संबंधितांच्याआधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे यासाठी प्रणाली नव्याने विकसित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (satellite image) वापर करण्यात येणार आहेतसेच ड्रोनतंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येईल अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्ती प्रवण क्षेत्र (objection prone area) आहेततिथे नागरिकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागतेअशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेहीधोरण नाहीअशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनीसांगितले


• महत्वाच्या बातम्या •


36 जिल्ह्यांची घरकुल यादी जाहीर. घरकुल यादी आणि जी आर पहा


पीएम किसान योजनेअंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, 12वा हप्ता लवकरच जमा होणार



ATM कार्ड असेल तर तुम्हाला मिळेल 5 लाखांचा फायदा ! वाचा माहिती


Leave a Comment