Sanjay Rathod : पूजा चव्हाण प्रकरणात शिंदे सरकार राठोडांची पुन्हा चौकशी करणार का?

Sanjay Rathod : पूजा चव्हाण प्रकरणात शिंदे सरकार राठोडांचीपुन्हा चौकशी करणार का?

महाविकास आघाडीच्या काळात पुजा राठोड या तरुणीने केलेल्या आत्महत्येमुळे त्याकाळी मंत्री असणारे संजय राठोडयांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता .

पण त्यानंतर महा विकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस यांचे सरकार आले आणि या मंत्रिमंडळातसंजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात आले आहे पण भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपली स्पष्टनाराजी व्यक्त केली आहे.

कारण महा विकास आघाडीचे सरकार असताना चित्रा वाघ यांनी सतत संजय राठोड हे दोषी आहेत आणि त्यांची चौकशीव्हावी अशी मागणी केली होती परंतु आता पुन्हा संजय राठोड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे .

कारण मंत्री दिपक केसरकर यांनी पुणे दौऱ्यावर असताना एक सूचक विधान केले आहे ते बोलले की चित्रा वाघ यांनीचौकशीची मागणी केली तर संजय राठोड यांची पुन्हा चौकशी होणार आहे

Leave a Comment