खरंच मांडूळ 50 लाखापर्यंत विकला जातो का?

 डिसेंबर चा पहिला आठवडामी गावातल्या तळ्यावर काम करत बसलो होतोतेवढ्यात एका मित्राचा फोन आला की साप निघालाआहेआम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो.एका दगडाखाली तो साप गेलेला आहे असं सांगण्यात आलं.


माझ्यातला बीयर ग्रिल्स लगेच जागा झालामी फोन ची टॉर्च घेऊन नीट बघितलं तर शेताच्या बांधावर असणाऱ्या एका दगडाच्याकडेला गडद काळया रंगाची हालचाल दिसलीमी जवळून बघितलं तर तो साप  होता.

ते जाडजूड शरीर आणि त्यावर असणारे खवले बघून भीती वाटलीपण संपूर्ण अंगावर समांतर असलेले खवले हे मांडूळ सापाचेअसतात हा प्राथमिक अंदाज लावलात्यामुळे हा कोणता विषारी साप नाही ही तर खात्री झाली.

मग मी विचार केला की त्याला बोट लावून बघावेतसा प्रयत्न देखील केला.

माझं बोट त्याच्या शरीराला स्पर्श होताच त्याने अंग आखडून घेतलं आणि तिथेच दगडाखाली सरकू लागला अन् गायब झाला.

पण तो दगडाखाली नाही तर नकळत माझ्या पायाखालून मागे सटकला होता.

मग शेवटी तो जमिनीवर आला तेव्हा पूर्ण आकार दिसला.

तर हा आहे मांडुळइंग्रजी नाव Earth Boa किंवा Red Sand Boa आहेयाला दुतोंड्या असेही नाव आहे कारण त्याला दोन्हीबाजूला तोंड आहेत असं म्हणतातहा मातीत राहणारा साप आहे आणि वेळ पडली तर मातीतील पोषक तत्वे खाऊन भागवतोम्हणून याला काही ठिकाणी माटीखाया असं देखील नाव आहे.

हा एक निशाचर साप आहे त्यामुळे तुम्हाला याचे दर्शन रात्रीच्या वेळेसच होण्याची शक्यता असते.

याचं शरीर अजगराप्रमाने जाडजूड असतंआणि पूर्ण वाढ झाल्यावर याची लांबी एक ते सव्वा मीटर पर्यंत वाढू शकते.

शरीराच्या वरचा भाग गर्द तपकिरी किंवा काळा असतोयांच्या शरीरावर पिवळसर ठिपके किंवा पट्टे असतातजर नसतील तरसमजून जायचं की साप पूर्ण विकसित आहे कारण हे जेव्हा लहान असतात तेव्हा ते पट्टे असतात अन् वयानुसार ते गायब होतात.

याच्या शरीरावर असणारे खवले लहान अन् एकसारखे असतात अन् त्याच्या कडा षटकोनी असतातयावरून त्याची ओळख सहजहोऊ शकते.

हा साप मऊभुसभुशीतवालुकामिष्रीत माती किंवा बिळात राहत असतोयाचे डोळे देखील Anaconda सारखे शरीराच्या वरच्याभागात असतात.

हा साप मांसाहारी आहेयांच्या अन्नात मुख्यतः छोटे प्राणी जसे की उंदीरसरडापालीबेडूकससे इत्यादी चा समावेश असतोतोमातीत स्वतः ला लपवून दडून बसतोभक्ष जवळ आले की त्यावर हल्ला करतो आणि विळखा घालून त्याला रीबेट करून टाकतोशरीराच्या वर असणारे डोळे यासाठीच असतील कदाचित.

हा साप बिनविषारी आणि निरुपद्रवी आहेहालचाल मंद असते अन् एकदम हळू सरपटत पुढे सरकतोत्यामुळे जर वस्तीत किंवारहिवाशी भागात आला तर याच्या जीवाला खूप धोका असतो.

खरं तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असा हा साप आहे पण दुर्दैवाने माणसांसाठी लकी आहे म्हणे.

असो

तो दगडाखाली असेपर्यंत कुणी त्याच्या जवळ पण जात नव्हतंपण एकदा रस्त्यावर आल्यावर मात्र आजूबाजूच्या एकदोन जणांनीफोन फिरवा फिरवी चालू केलीमांडूळ घेणाऱ्या लोकांना काँटॅक्ट करून ते या मांडूळाचे स्वरूप सांगू लागलेतिकडून पण यालोकांना “पकडुन ठेवासकाळी येतो” असं सांगण्यात आलं.

मी ते सर्व ऐकून मिश्किल हसलो फक्तकाही बोललो नाही.

मग कुणीतरी युरिया चं ठीकं आणून दिलंमी एक मऊ काठी घेतलीत्या सापाच्या डोक्यावर दाबलीएका हाताने त्याची मानपकडली आणि दुसऱ्या हातात ते ठीकं पकडुन त्या सापाला आत मध्ये घातलं.

तसं लगेच एक दोन कार्यकर्ते ते ठीकं घ्यायला सरसावले त्यावर मी म्हणालो “आबे पळकुठणं आलासमी धरलाय सापअन् मीचइकणार“. 😁😁

एक जण म्हणाला की त्याला उद्या उन्हात धरासावली पडणार नाहीमी म्हणालो मी रातोरातच गेम करावा म्हणतोय.

एक जण म्हणाला त्याला टेस्टर लावून बघा लाईट लागते का तेमी म्हणालो हो आता मला करंट लागला होतात्यामुळे टेस्टर चीगरज नाही.

एक जण म्हणाला की आरश्यात बघा प्रतिबिंब दिसणार नाहीमी म्हणालो त्याने त्याची पॉवर कमी होतेउगाच कोटीचा कारभारलाखात यायचा.

असो

आता माझ्या जवळ साप होताअन् खालील पर्याय होते.

 • हा साप एक दोन कोटी ला विकला जातोकुणाला तर कॉल करून सौदा करायचापैश्याचे गाठोडे घेऊन गावी यायचंअन्काम सोडून पैसे उडवत बसायचं.
 • याला घरी नेऊन घराच्या विशिष्ठ दिशेला ठेवायचंम्हणजे घरात सुबत्ता येईल मग काही काम धंदा नसला तरी काही हरकतनाही.
 • कुठल्या तर मांत्रिकाला गाठून पूजा करून पैश्यांचा पाऊस पाडायचा अन् त्या महापुरात वाहून जायचं.
 • गावात एखाद्या पडक्या जुन्या वाड्यात नेऊन याला सोडायचंमग हा मला तिथे असलेल्या गुप्त धनाच्या जवळ घेऊन जाईलकशाला लागतोय मेटल डिटेक्टर अन् फीटेक्टर.
 • हा साप नक्कीच पूर्ण विकसित अन् दोन किलो पेक्षा जास्त होताम्हणजे हा नक्कीच गुप्तधन गाठणारवजन नाही भरलं तरत्याच्या तोंडात माती भरायची पण गुप्त धन सोडायचं नाही.

किंवा मग खालील गोष्टी होऊ शकत होत्या 👇🏿

 1. हा साप वन्यजीव कायदा १९७२ नुसार संरक्षित आहेमग दुसऱ्याच दिवशी जर कुणी खबर दिली की पोलिसांना सापडायचंतस्कर म्हणून तुरुंगात जायचंपेपरात झळकायचं आणि किडन्या विकून सर्व निस्तरत बसायचं.
 2. याची संरक्षण स्थिती ही एनटी म्हंजे Nearly Threatened (विलुप्त होण्याच्या मार्गावरआहे अन् एक साप कमी करूनआपण पण त्या आकडेवारीत हातभार लावायचा.
 3. त्या सापाला तिथेच तत्वांच्या दयेवर सोडून द्यायचंकारण हिवाळा/पानगळ हा त्यांचा प्रजनन काळ असतोतो बिचारात्याच्या मेटिंग सिजन च्या डेटिंग ला चालला असला तर आपण उगाच कशाला त्याची सेटिंग बिघडवायची?

असो..

वरील घटना आणि मुद्दे वाचून तुम्हाला पुसटसा तर अंदाज आला असेलच की मला काय म्हणायचं आहे ते.

मित्रानोहा साप एक सामान्य साप आहे पण आपल्या आडमुठ्या जनतेच्या अंधश्रद्धेचा शिकार झालेला आहेएवढा की आताविलुप्त होत चालला आहेयाचे गांभीर्य किती आहे याचा आजच विचार झाला पाहिजे.

या सापाला करंट असतोप्रतिबिंब किंवा सावली दिसत नाहीदोन तोंड असतात या आणि इतरही सर्व निव्वळ बालिश अंधश्रद्धाआहेत.

त्याची शेपूट इतर सापांसारखी दंडगोलाकार निमुळती नसते तर बोथट असते त्यामुळे असं दिसू शकतंकिंवा हा साप धोक्याच्याक्षणी जमिनीत आपले तोंड खुपसून शेपटीची हालचाल करतो चकवा देण्यासाठीत्यामुळे दोन तोंड आहेत असं जे म्हणतात ते त्याचचकव्याचा शिकार आहेत बरं का!

अन् या सापाला किंमत मिळत असेल तर त्याची खालील कारणे असू शकतात (त्याचे पण काही पुरावे आहेत की नाही माहितीनाही👇🏿

 • कॅन्सर च्या उपचारासाठी.
 • कॉस्मेटिक साठी.
 • चामड्याची उत्पादने बनवण्यासाठी.
 • Exotic Animal पाळीव म्हणून ठेवण्यासाठी.
 • असंही म्हणतात की याच्यातून लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी औषध बनवतात. Erectile Dysfunction ही समस्या दूर होतेम्हणजे ज्या व्यक्तीच्या लैंगिक जीवनात कायमचे साडे सहा वाजले आहेत त्यांना निदान पावणे सात पर्यंत तरी आनु शकतं. (कुणाला समजलं नसेल तर घड्याळात बघासाडे सहा वाजता सगळे काटे खाली झालेले असतात😁😁😁

असोमला तर यातील कशातच इंटरेस्ट नव्हतामी गप माझ्या मित्राला सोबत घेतलंअन् मीसाप अन् तो मित्र सापाला गिऱ्हाईकबघायला म्हणून गर्दीतून बाहेर निघालो अन् गावच्या जंगलात गेलो.

आपल्या स्वार्थी आणि निराधार गोष्टींमुळे आपण निसर्गाला कशी हानी पोहचवत आहोत हा विचार करून खिन्न तर झालोचपणमी त्या असंवेदनशील प्रकारात मोडत नाही याचा अभिमान देखील वाटला.

अन् राहिला प्रश्न पन्नास लाखांचाते मला अश्या मार्गाने नको आहेतहा मांडूळ जर वेळ आल्यावर माती खाऊन जगू शकतो तर मीपण वेळ आली तर मातीत राबून भागवेन पण कुण्या मुक्या आणि संरक्षित प्राण्याचा सौदा करणारा दलाल होणे या निसर्गप्रेमीफिरस्ती पामराला नामंजूर आहे.

Leave a Comment