7/12 online येथे बघा | असा बघा आपल्या जमिनीचा 7/12

 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपल्या जमिनीचा सातबारा काढायचा असेल तर नेहमी आपल्याला खूप त्रास होतो.

पण आज मी आपल्याला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे .ज्यामुळे तुम्ही तुमच्या जमिनीचा सातबारा, 8अ चा उतारा तसेच फेरफार फक्त दोन मिनिटात आपल्या मोबाईल वरून काढू शकता.

मित्रानो सर्वात आधी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग च्या वेबसाईट वरती जायचं आहे https://bhulekh.mahabhumi.gov.in/ 

येथे गेल्यानंतर आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे कि आपण कोणत्या विभाग मध्ये येतो. जसे कि अमरावती,औरंगाबाद ,कोकण ,नागपूर ,नाशिक ,आणि पुणे यापैकी आपल्याला निवडायचे आहे.

त्यानंतर आपल्याला GO नावावर क्लिक करायचे आहे .क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे 7/12, 8अ,किंवा मालमत्ता पत्रक यापैकी काय पाहायचे आहे ते निवडायचे आहे. 

जसे कि मला 7/12 बघायचा आहे त्यामुळे मी 7/12 या पर्यायावर क्लिक करणार आहे .त्यानंतर आपल्याला तिथे आपला जिल्हा व तालुका कोणता आहे हे निवडायचे आहे. त्यानंतर तिथे आपले गाव कोणते आहे हे निवडायचे आहे.त्यानंतर तिथे आपल्याला गट नंबर ,आपले पहिले नाव ,किंवा गावातील संपूर्ण यादी यापैकी निवडायचे आहे.

मला गावातील संपूर्ण नाव बघायचे आहेत त्यामुळे मी संपूर्ण नावे यावर क्लिक करणार आहे . त्यानंतर आपल्याला तिथे आपल्या नावानुसार यादी बघायला मिळेल .व त्यातुन आपल्याला आपल्या नावावर क्लिक करायचे आहे .

त्यानंतर आपला सातबारा बघण्यासाठी खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.नंबर टाकल्यानंतर 7/12 पहा या बटन वर क्लिक करायचे आहे .त्यानंतर आपल्याला दिसेल कि आपला सातबारा तिथे open झालेला आहे.

अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा 7/12 online पद्धतीने आपल्या मोबाईल वर बघू शकतो 

Leave a Comment