PM Kisan Yojna : अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर Zero Balance, योजनेतील निधीची वसुली अशी होणार

 PM Kisan Yojna: राज्य स्तरावर महसूल आणि (Agricultural Department) कृषी विभागाने योग्य प्रकारे यंत्रणा न राबवल्यामुळे (PM Kisan Sanman Yojna) पीएम किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची वसुली थकीत आहे. पात्र नसतानाही ज्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून वसुली करण्याचे (Central Government) केंद्र सरकारचे धोरण आहे

. मात्र, अशा अपात्र शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत या योजनेच्या खात्यावर पैसेच ठेवलेले नाहीत. त्यामुळे परस्पर वसुली करता येत नाही. या वसुलीची जबाबदारी ही महसूल विभागावर सोपिवण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवर कृषी आणि महसूल विभागातील मतभेदामुळे ही मोहीम रखडली होती.

आता ‘सोशल ऑडिट’ केले जाणार आहे. म्हणजेच अशा अपात्र असूनही लाभ घेणाऱ्यांच्या याद्या गाव पातळीवर प्रसिध्द करुन त्याची संपूर्ण माहिती घेऊन वसुली केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. शिवाय यापूर्वीच गाव पातळीवर शिबिरे राबवून शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कृषिमित्रांनी दिलेल्या माहितीवरच अवलंबून न राहता पुन्हा तलाठी, ग्रामसेवक व कृषीसेवकाकडून याची चौकशी केली जाणार आहे. कृषिमित्र आणि या संबंधीत यंत्रणेची माहिती बरोबर असेल तर त्यासंबंधीचे कागदपत्रे ही तहसील कार्यालयाकडे जमा करावी लागणार आहेत. यावरुनच अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली आणि इतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हे ठरवले जाणार आहे.

Leave a Comment