नवीन राशन कार्ड साठी शासनाने लावले नवे नियम ! Ration card Apply

 नवीन राशन कार्ड साठी शासनाने लावले नवे नियम ! Ration card Apply 

राशन कार्ड माहिती

Ration Card : नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी तसेच रेशन कार्डात बदल करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आलेत. त्यानुसार अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं गरीब माणसांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. (Compulsory submission of caste certificate for issuance of ration card)2 जून 2021च्या आदेशानुसार, रेशन धान्य वाटपासाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये जातीच्या उल्लेखासाठी स्वतंत्र रकाना देण्यात आलाय. हा रकाना भरल्याशिवाय अर्जदाराचा रेशन कार्डाचा अर्जच स्वीकारला जात नाही. त्यामुळे आता गोरगरीब, दलित बांधवांना जात प्रमाणपत्रासाठी सरकार दरबारी हेलपाटे घालावे लागणार आहेत. ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी रेशनचं धान्य घ्यावं लागतं, त्यांना जात प्रमाणपत्रासाठी आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची वेळ आली आहे.

Leave a Comment