तीन लेकरांची आई अठरा वर्षीय मावसभावाच्या प्रेमात पागल झाली मात्र त्यानंतर ..

देशात रोज अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत .बिहारच्या झंझारपूर अनुमंडलमध्ये गेल्या बुधवारी रस्त्याच्या कडेला एका अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र हा प्रकार विवाहबाह्य संबंधातून घडल्याचे समोर आले आहे .

मुख्य रस्त्याच्या खाली झाडांमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती गावातील लोकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही केस सॉल्व्ह करत यापाठीमागे चक्क तीन मुलांची आई असलेल्या मृत व्यक्तीच्या पत्नीचाच हात असल्याचे आढळून आले आहे .मृतकाचं नाव मोहम्मद माशूक आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार , मोहम्मद माशूकची पत्नी नसीमा खातूनचं तिचा मावस भाऊ मोहम्मद सोनूसोबत गेल्या तीन वर्षांपासून अफेअर सुरू होतं. त्यामुळे पत्नीने तिच्या प्रियकरासोबत आणि त्याच्या ३ मित्रांसोबत मिळून पतीची हत्या केली. झंझारपूरचे एसडीपीओ आशिष आनंद म्हणाले की, मोहम्मद माशूकच्या हत्येत त्याच्या सासूचाही समावेश होता. हत्याकांड घडवून आणणारा मोहम्मद सोनू उर्फ निजामुद्दीन रैयाम त्याच गावातील रहिवाशी असून त्याचे वय फक्त १८ वर्षे होते.

 

त्याच्या सोबत नसीमा खातूनचे अफेअर सुरु होते. पतीला याची माहिती समजल्यानंतर त्यांच्यात भांडणे देखील सुरु झाली मात्र अखेर तिने प्रियकर असलेल्या तिच्या मावसभावाला याची माहिती दिली आणि त्यानंतर पतीची हत्या करण्यात आली.

 

नसीमा खातूनच्या सांगण्यावरून मोहम्मद सोनूने मोहम्मद इकराम, मोहम्मद बरकत, मोहम्मद उजैर नावाच्या तीन मित्रांनी मिळून प्लॅननुसार माशूक बोलावून घेतले आणि त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याला बाइकवरून मेंहथ पूलावर घेऊन गेले त्यानंतर धारदार हत्यारांनी त्याची हत्या केली. पोलिसांनी ३६ तासांच्या आत ही केस सॉल्व्ह केली. तसेच मृतकाची पत्नी, सासू आणि इतर सहा आरोपींना अटक केली

Leave a Comment