चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस पाठवणार, सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार – संजय राऊत

 

मुंबई, 22 सप्टेंबर : भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) ईडीचा इतका अनुभव कधीपासून? असा सवाल विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र लिहून त्याला उत्तर दिलं.

चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस पाठवणार, सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार - संजय
राऊत

यानंतर संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीयमध्ये (Saamana editorial) हे पत्र जसेच्या तसे छापले. इतकेच नाही तर संजय राऊत यांनी आक्रमक होत चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.

हे पण वाचा 👉  aajcha soyabin bajar bhav : आजचा सोयाबीन बाजार भाव 05/03/2022

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावर भाष्य करताना म्हटलं, चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी घोटाळ्याच्या संदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याच्या संदर्भात पुढील चार दिवसांत चंद्रकांत पाटील यांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. अब्रुनुकसानीचा दावा तर आहेच. हा कसला आरोप आहे, आम्ही असे धंदे करत नाहीत. त्यांना संपूर्ण कायदेशीर कारवाईला जावं लागेल. लोकं 100 कोटी रुपयांचा दावा, 50 कोटी रुपयांचा दावा दाखल करतात. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार.

हे पण वाचा 👉  आजचा कांदा बाजार 22/12/2021

तुम्ही अग्रलेखात लिहिले की, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?” संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरुन मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे.

हे पण वाचा 👉  आर्यन खान अटक झाल्यामुळे सुहाना खान ने घेतला मोठा निर्णय

 

Leave a Comment